एमआयटी-सीएसएन येथे जिज्ञासा प्रकल्प प्रदर्शन उत्साहात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी-सीएसएन) येथील सेंटर फॉर इंजिनिअरिंग (सीईई) तर्फे जिज्ञासा २०२६ या प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन मंथन हॉल येथे करण्यात आले. प्रदर्शनात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले २०६ पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. विविध ११ विषयांवर आधारित या प्रदर्शनात १,४५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रदर्शनास एक्सपर्ट ग्लोबलचे सीईओ मुकुंद कुलकर्णी, चंद्रभूषण पांडेय, सूर्यकिरण वाघचौरे, विवेक टोंड्रे, महेश कुरुडे, कमलेश सुराणा, कार्तिक सरदार, अमित कुमार गंगावणे आणि डॉ. आशिष रोकडे यांनी भेट दिली. उद्योग प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेतून दोन विद्यार्थी प्रकल्पांना इंटर्नशिपच्या संधी मिळाल्या, तर दोन प्रकल्पांची स्टार्टअप विकासासाठी निवड करण्यात आली. तसेच ४० विद्यार्थी प्रकल्पांची पेटंट किंवा डिझाईन नोंदणीसाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमास एमआयटी - सीएनएनचे संचालक डॉ. निलेश जी.
पाटील, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. अशोक केचे, विभागप्रमुख प्रा. भूषण कुलकर्णी आणि डॉ. मझहर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. के. ए. अंतरकर, प्रा. पी. एस. खंडेलवाल, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. ए. एच. कर्डिले, प्रा. एस. डी. खडके, प्रा. समीना खान, प्रा. ए. डी. भारती, प्रा. एस. एन. वाकळे, प्रा. एस. बी. मोरे यांनी परिश्रम घेतले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions